नाशिक प्रतिनिधी | आम्ही कलम ३७० हटवले तेव्हा भारत पाकिस्तान या दोन्ही देशात तणाव निर्माण झाला. तेव्हा रस्ता भटकलेल्या काँग्रेसला देश विघातक आणि पाकिस्तानच्या फायद्याची वक्तवे देताना पहिले. मात्र शरद पवार यांच्या सारखा व्यक्ती देखील मतांच्या फायद्यासाठी पाकिस्तानच्या बाजूची वक्तव्य देत आहे. त्यांना पाकिस्तान चांगला वाटत आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
मागील काही दिवसात शरद पवार यांनी पाकिस्तानच्या बाबत चांगले वक्तव्य केले होते. पाकिस्तान मधील लोक पाहुण्यांचे उत्तम स्वागत करतात असे शरद पवार म्हणाले होते. त्याच वक्तव्याचा धागा पकडून नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात फडणवीस सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचून काढला आहे. त्याच प्रमाणे भारत संरक्षण सिद्धतेसाठी किती शक्तिशाली बनत चालला आहे याबद्दल विस्तृत भाष्य केले आहे.