हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Aarakshan) मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. जालनामध्ये यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केलं असून आज उपोषणाचा आठवा दिवस आहे. त्यापूर्वीच पोलिसानी आंदोलकांना लाठीमार केल्यानंतर संपूर्ण वातावरण ढवळून निघालं आहे. वेळ पडली तर ओबीसी कोट्यातून मराठा समजाला आरक्षण द्यावे अशी मागणी काहीजण करत आहेत. परंतु ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास ओबीसीमधील गरीबांवर अन्याय होईल. त्यामुळे 50 टक्के आरक्षण मर्यादा वाढवण्याची गरज आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हंटल.
शरद पवार जळगाव (Jalgaon) दौऱ्यावर असून त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत विचारलं असता ते म्हणाले, ओबीसींच्या कोट्यातून आणखी वाटेकरी करणे हा गरीब ओबीसी लोकांवर अन्याय होईल, असं काही लोकांच म्हणणं आहे. ही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखे नाही. त्याला पर्याय हा आहे की, आज जी 50 टक्क्यांची अट आहे, यात आणखी 15 ते 16 टक्क्यांची वाढ करण्यात यावी, या संदर्भातील दुरुस्ती पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारने करून घेतली, तर हे प्रश्न सुटतील असं म्हणत पवारांनी आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकार कडे ढकलला.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना येथील लाठीमारानंतर मराठा समाजाची माफी मागितली होती. पॉलिसी बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झाली आहे. त्यांची मी क्षमा याचना करतो. मराठा समाजाची क्षमा मागतो, असं म्हणत फडणवीसांनी सरकारकडून माफी मागितली होती. त्यावर विचारलं असता फडणवीस यांनी माफी मागणं म्हणजे एकप्रकारे गुन्ह्याची कबुलीच देणं आहे, असं शरद पवार म्हणाले.