मैदानात पैलवान नाही म्हणता, मग मोदींना दिल्लीवरून कशाला बोलावता ; शरद पवारांचा फडणवीसांना टोला

0
54
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकांसाठी एकूण वातावरण पाहून आमचे उमेदवार तेल लावून उभे आहेत मात्र समोरच्यांचे पैलवान मैदानात दिसत नाहीत असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी एकाच आठवड्यात दोनदा जोरदार समाचार घेतला. मी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे हे मुख्यमंत्र्यांना माहिती नसावं अशा शब्दात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना खडसावलं. आमचे पैलवान तुम्हाला मैदानात दिसत नाहीत तर मग पंतप्रधान दिल्ली सोडून परतुरमध्ये प्रचारासाठी कशाला येतायत असा प्रश्न देखील पवारांनी उपस्थित केला.

आम्ही तुम्हाला मैदानात दिसत नाही कारण आम्ही तुमच्याशी नाही तर पैलवानांशी कुस्ती खेळतो असा पलटवारदेखील शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. अमित शहा हे नाव ५ वर्षांपूर्वी कुणी ऐकलं नाही आणि कुणी त्यांना पाहिलंही नव्हतं. आज मात्र महाराष्ट्रात आल्यावर अमित शहा आणि नरेंद्र मोदी सर्वात अगोदर आपलं नाव घेतात, यावरूनच आपली भीती त्यांना आजही वाटत असल्याचं स्पष्ट होत असल्याचं पवार पुढं म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here