“रेकॉर्डिंगशी माझा काहीही संबंध नाही, सर्व आरोपांची चौकशी करावी”; फडणवीसांच्या आरोपांवर शरद पवारांची प्रतिक्रिया

Pawar Fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्याचे राजकारण तापले असून विरोधकांकडून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकावर आरोप केले जात आहेत. दरम्यान काल भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी खासदार शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष नाव घेत आरोप केला. यावरून खासदार शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. “ज्या काही गोष्टी फडणवीसांनी सांगितल्या त्यांचे मला कौतुक वाटते. माझ्यावर झालेल्या सर्व आरोपाची चौकशी करावी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस खासदार शरद पवार यांनी दिली.

खासदार शरद पवार यांनी भाजप नेत्यांकडून करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर केलेल्या आरोपांविषयी भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की, एका शासकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन त्याच्या संबंधीत १२५ तासांची रेकॉर्डिंग हे करण्यासाठी फडणवीस किंवा त्यांचे सहकारी यशस्वी झाले. १२५ तास रेकॉर्डिंग करायचं याचा अर्थ ही प्रक्रिया किती तास चालली असेल याचा हिशोब केला तर ही कौतुकास्पद बाब आहे.

१२५ तास रेकॉर्डिंग काम करण्याचं काम खरंच असेल तर शक्तीशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.अशा एजन्सी या फक्त भारत सरकारकडे आहेत. त्यामुळे राज्यात जाऊन राज्यात जाऊन राज्य सरकारच्या एखाद्या कार्यालयात जाऊन तास न् तास जे काही काम केलं टेप केलं रेकॉर्ड करायला ते यशस्वी झाले. व्यक्तिशा या गोष्टीत माझा कुठलाही संबंध नाही. आमची एक तक्रार आहे. कुणी तरी तक्रार करायची आणि त्या तक्रारीतून लोकप्रतिनधींवर वेगवेगळ्या एजन्सीची मदत घेऊन त्यांना नामशेष केलं जात आहे.

बंगाल आणि महाराष्ट्रात त्याची संख्या अधिक आहे. अनिल देशमुखाची तक्रार पोलीस अधिकाऱ्याने केली. देशमुख तुरुंगात आहे. ज्यांनी तक्रार केली त्यांच्या चौकश्या सुरू आहेत. देशमुख यांना तुरुंगात टाकल्यानंतर चौकशी कशा पद्धतीने किती वेळा केली जाते. सत्तेचा गैरवापर करून कशी केली जाते त्याचं हे मूर्तीमंत उदाहरण आहे, असे पवार यांनी म्हंटले.