हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल एकामागून एक अशी तब्बल 14 ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून जातीयवादी राजकारण हा शरद पवार व राष्ट्रवादीचा जुना ट्रॅक रेकॉर्ड आहे,” अशी टीकाही केली. फडणवीसांच्या त्या चौदा ट्विट व टीकेला पवारांनी दोनच शब्दात उत्तर दिले आहे. सध्या फडणवीसांच्या ट्विटचा आनंद घेतोय, अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे.
शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या त्या ट्विटवरील टीकेला उत्तर दिले. यावेळी पवार म्हणाले की, सध्या देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटचा आनंद घेतोय.
मनसेवरही साधला निशाणा
यावेळी शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत भूमिका मंडळी. राज ठाकरे हे हिंदुत्वाच्या मार्गाने जात आहे. यावेळी त्यांनी मनसेने सादर केलेल्या पुस्तकाबाबतही पवार यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी ते म्हणाले की, जेम्स लेन या लेखकाने शिवाजी महाराजांच्याबद्दल काहीही लिहिलं आहे. त्याने शिवछत्रपती आणि जिजामाता यांच्याबद्दल चुकीचा इतिहास लिहिलाय. अत्यंत गलिच्छ इतिहास लिहिला गेलाय. पण ते जेम्स लेन हा चांगला इतिहास अभ्यासक असल्याचे पुरंदरेंनी म्हटले. त्यांच्या बद्दलची लोकांनी भूमिका या आधीच स्पष्ट केली आहेअसेही यावेळी पवार यांनी म्हंटले.
फडणवीसांनी काय केले चौदा ट्विट ?
देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी ट्विट करीत शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. फडणवीस यांनी 2012 मधील घडलेल्या आझाद मैदानावरील घेतने वरून पवारांवर निशाणा साधला आहे. त्यांनी 2012 साली राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता असताना मुंबईतील आझाद मैदानात हिंसाचारानंतर कशी ढिलाई दाखविली गेली असल्याचे सांगत यावरुनही बातमीची लिंक पोस्ट केली आहे. तसेच आघाडी सरकारने त्यावेळी रझा अकादमीवर कारवाई केली नाही? असा सवालही उपस्थित केला आहे.