मुंबई | ऑपरेशन लोटस किंवा ऑपरेशन कमळ हा शब्द आपण अनेकदा भाजपा नेत्यांच्या तोंडून ऐकला आहे. हे ऑपरेशन कमळ किंवा ऑपरेशन लोटस म्हणजे काय? हे आता दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच सांगितलं आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा तिसरा भाग प्रदर्शित झालाय. या मुलाखतीत संजय राऊत यांनी ऑपरेशन कमळ म्हणजे काय? असा प्रश्न विचारताच शरद पवार यांनी उत्तर दिलं.
काय म्हणाले शरद पवार?
” ऑपरेशन कमळ याचा अर्थ सरळसरळ सत्तेचा गैरवापर करुन लोकांनी निवडून दिलेली सरकारं पाडण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी केंद्रातल्या सत्तेचा पुरेपूर वापर करणं”
महाराष्ट्रात येत्या ऑक्टोबर महिन्यात ऑपरेशन कमळ होईल असं सातत्याने पसरवलं जातंय.. असा प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले “हो पहिल्यांदा त्यांनी तीन महिन्यात सांगत होते. आता सरकारला सहा महिने झाले. त्यानंतर सप्टेंबरचा वायदा आहे, काही लोक ऑक्टोबर महिन्याचा वायदाही करत आहेत. मात्र मला खात्री आहे की पाच वर्षे महाविकास आघाडीचं सरकार उत्तमरित्या राज्याचा कारभार करेल. ऑपरेशन कमळ असो किंवा आणखी काही असो याचा काहीही परिणाम उद्धव ठाकरेंच्या सरकारवर होणार नाही.”
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.