सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या विरोधात 1999 साली शेतकरी कामगार पक्षाचे खासदार रामशेठ ठाकूर यांचे एक मत आदरणीय शरद पवार यांच्या सांगण्यावरून विरोधात गेले अन् सरकार पडले. तेव्हा शरद पवारांच्या शब्दात किती ताकद आहे, हे कळते आणि प्रधानमंत्री घरी गेले असे सांगत भाजपा सरकार कोसळण्यातील एक खुलासा सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी केला.
सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज येथे लोकनेते रामशेठ ठाकूर भवन या इमारतीचे उदघाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील पाटील बोलत होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील, उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, सदस्य रामशेठ ठाकूर, कायदेशीर सल्लागार अॅड. दिलावर मुल्ला, प्राचार्य डाॅ. विठ्ठल शिवणकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित आहेत.
खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, रामशेठ होते त्यांचे एक मत होते. आदरणीय पवार साहेब यांच्या सांगण्यावरून ते एक मत बाजूला गेले आणि अटलबिहारी हे गादीवरून खाली उतरले. तेव्हा त्याच्या शब्दात किती ताकद आहे. एकलव्याला शिकवले नाही, मात्र द्रोणाचार्यचा पुतळा केला आणि बाण बरोबर मारला. त्याच रामाने आज जे वैभव उभे केले. आज माझ्या मित्राला पुरस्कार मिळाला, बघायला मिळाला आनंद झाला.




