शरद म्हणतात,’अभी तो मैं जवान हूँ ‘

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणाची शैली सर्वश्रुत आहे. याचीच प्रचिती काल आली ती म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या त्यांच्या सभेमध्ये. काही दिवसांपूर्वी एका पत्रकारावर रागावलेले पवार संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाने पाहिले. पण कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये पवारांनी अशी दोन वक्तव्य केली की संपूर्ण सभागृह हास्य कल्लोळात बुडाले.

नेत्यांची भाषणे सुरू असताना ‘काँग्रेस’चे माजी मंत्री सतेज पाटील यांच्यासह ‘राष्ट्रवादी’चे राधानगरीचे उमेदवार के. पी. पाटील आणि त्यांचे मेहुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये पवारांच्या वयाचा उल्लेख केला होता. त्याचा संदर्भ देत त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये उत्तर दिले.

”अभी तो मै जवान हूँ ” असं पवारांनी मिश्किलपणे भाषणातून बोलताच अक्षरशः सभागृहात हास्याचा आणि टाळ्यांचा पाऊस पडला. तर दुसरीकडे ”दोन पाटील म्हणजे के.पी आणि ए.वाय हे मेव्हणे-पाहुणे असल्याने मेव्हण्याची भांडणे खूप महागात पडतात” असे त्यांनी सांगताच पुन्हा मोठा हास्यकल्लोळ झाला. यावेळी त्यांनी त्यांचे मेव्हणे एन.डी.पाटील यांच्या सोबतच राजकीय वैर कसं होतं याचा देखील खुलासा केला.

शरद पवार म्हणतात अभी तो मै जवान हूँ..

Leave a Comment