शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं- बाळासाहेब थोरात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान काँग्रेस वर टीका करताना काँग्रेसची तुलना उत्तरप्रदेश मधील जमीनदारांशी केली होती. एकेकाळी देशभर पसरलेल्या काँग्रेसची अवस्था सध्या उत्तर प्रदेशच्या एखाद्या जमीनदाराच्या मोडकळीस आलेल्या हवेलीसारखी झाली आहे’, अशी टीका पवारांनी केल्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पवारांना ऑफर दिली आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले, शरद पवारांच्या विधानाशी असहमत आहे. काँग्रेसने कधीही जमीनदारी केली नाही. काँग्रेसचे विचार पुरोगामी विचार आहेत. आपण एका विचाराचे आहोत. पवारांनी टीका-टीप्पणी करण्यापेक्षा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यायला हवं. युपीए म्हणून एकत्र होतो आणि सहकारी म्हणूनही एकत्र होतो. युपीएचा कारभार चांगला होता, असे बाळासाहेब थोरात म्हणाले

शरद पवार नेमकं काय म्हणाले होते-

आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातील एखाद्या जमीनदारासारखी झाल्याचं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती आहे. गावामध्ये त्यांच्याकडे हवेली असते. सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या हजारो एकर जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. आता त्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकदही त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमिनी आता 15-20 एकरवर आल्या आहेत. सकाळी जमीनदार उठतो, आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवं पिक दिसतं. तेव्हा तो हे सर्व हिरवं पिक माझं होतं, असं सांगतो. माझं होतं. आता नाही, असं सांगत पवारांनी काँग्रेसची आजची स्थिती विषद केली

Leave a Comment