हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप नेत्यांकडून सरकार पडण्याबाबत वारंवार वक्तव्ये केली जात आहेत. तसेच सरकारमध्ये फूट पाडण्याबाबतही प्रयत्न केले जात आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकार कोणत्याही परिस्थितीत पडणार नाही. या सरकारच चांगलं सुरु असून या सरकारला कोणताही धोका नाही. आणि हे सरकार अजून पाच वर्षे पूर्ण करणार, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी आज दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे स्थिर आहे, हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल आणि पुढच्या निवडणुकीनंतर पुन्हा सत्तेत येईल, असा आम्हाला विश्वास आहे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/997536671168362
या महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नसून आमच्या सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे चांगले चालले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी-सेना भाजप विरोधात एकत्र उभी आहे. त्यामुळे कुणाच्या सांगण्यावरुन भाजपसोबत राष्ट्रवादी मुळीच जाणार नाही. राज्यात मविआ सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ नक्कीच पूर्ण करे आणि पुन्हा सत्तेत येईल, असे पवार यांनी म्हंटले.