हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी कर्मचाऱ्यांचे सरकार मध्ये विलनिकरण व्हावं यासाठी राज्यभर कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता जर एसटीचे विलनिकरण केलं तर इतर महामंडळ देखील तशी मागणी करतील असा दावा केला. साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि त्यांच्या मागण्या याविषयी सविस्तर भूमिका मांडली आहे.
शरद पवार म्हणाले, एसटी विलीनीकरण केलं तर बाकीचे महामंडळ देखील विलीनीकरणाची मागणी करतील. आणि दुसरं म्हणजे विलीनीकरणचा मुद्दा आत्ता कोर्टात आहे. त्यामुळे त्यावर मी आत्ता बोलणार नाही असे पवारांनी म्हंटल.गेल्या 2 वर्षात एसटी ची अवस्था वाईट आहे. अलिकडच्या काळात राज्य सरकारने ५०० कोटी रुपये एसटीला वेतनवाढ करण्यासाठी दिले. ही अवस्था एसटीची कधीही आली नव्हती त्यामुळे एसटीचं अर्थकारण कसं सुधारायचं यावर आम्ही चर्चा केली”, असं शरद पवार म्हणाले.
सध्या राज्यात ९६ हजार एसटी कर्मचारी आहेत. राज्य सरकारच्या एकूण शासकीय कर्मचाऱ्यांशिवाय अन्य आरोग्य खात्यातील कर्मचारी, आशा वर्कर्स, एसटी कर्मचारी, राज्यातील इतर काही कर्मचारी आहेत जे राज्य सरकारचे कर्मचारी नसले, तरी सरकारशी संबंधित आहेत. एकदा विलिनीकरणाचं सूत्र अवलंबलं, तर ते सर्वांना लागू होईल. त्याचं आर्थिक गणित काय असेल, त्यावर सरकारला विचार करावा लागेल”