हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रतिभा पवार यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असून मुंबईमधील ब्रीच क्रँडी रूग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी खुद्द शरद पवार स्वतः रूग्णालयात दाखल झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना नुकतीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार केले जात आहेत.
Maharashtra | NCP chief Sharad Pawar's wife Pratibha Pawar admitted to Mumbai's Breach Candy Hospital: She will undergo surgery at Breach Candy Hospital, NCP President Sharad Pawar has reached the hospital: NCP
— ANI (@ANI) July 14, 2023
शरद पवार यांनी जेव्हा पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केलीहोती. तेव्हा शरद पवार यांच्यासोबत त्या हॉलमध्ये प्रतिभा पवार याही उपस्थित होत्या. मात्र, त्यानंतर शरद पवारांनी राजीनामा मागे घेत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली.