हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : सध्या जगभरातील शेअर बाजारामध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे. अशातच तीन अमेरिकन बँका बुडाल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीती पसरली आहे. अमेरिकन बँकिंग क्षेत्रातील या संकटामुळे जागतिक मंदीची भीतीही बळावली आहे. अशातच जर आपण शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवत असाल तर शेअर बाजाराच्या या अस्थिरतेमध्ये नफा मिळविण्यासाठी काही उपाय करावे लागतील. यासाठी जगातील दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे यांनी दिलेल्या काही टिप्स खूप उपयोगी पडू शकतील.
इक्विटी मार्केटमधील आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारावर वॉरेन बफे यांनी गुंतवणूकदारांना मंदी पासून बचाव करण्यासाठी गुंतवणूकीच्या अनेक टिप्स दिल्या आहेत. जर आपण त्यांनी दिलेल्या या टिप्स फॉलो केल्या तर आपले नुकसान होणार नाही. याशिवाय आपल्याला भरपूर पैसे देखील मिळतील. Investment Tips
दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक
असे म्हंटले जाते कि, शेअर मार्केटमध्ये पैसे शेअर्सच्या खरेदी-विक्रीने नाही तर संयम बाळगून कमावले जातात. वॉरन बफे हे देखील यावर विश्वास ठेवतात. बफे यांच्या कडून गुंतवणूकदारांना दीर्घकालावधीसाठी गुंतवणुक करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला जातो. ते म्हणतात की,” शेअर बाजार कालांतराने वाढतो. याचा फायदा दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्याला होतो.” Investment Tips
अस्थिरतेने डगमगू नका
वॉरेन बफे यांना वाटते की,” जे गुंतवणूकदार शेअर बाजारातील अस्थिरतेबाबत जास्त प्रतिक्रिया देतात ते आपले नुकसान करून घेतात. अस्थिरतेच्या बाजारपेठेत गुंतवणूकदारानांकडून अनेकदा घाईघाईने निर्णय घेतले जातात. असे कधीही करू नये. बाजारातील अस्थिरते वेळी घाबरू न जाता, शांत राहा आणि दीर्घकालीन लक्ष्यावर लक्ष केंद्रित करा. असे करण्याने कधीही नुकसान होणार नाही. Investment Tips
कंपन्यांचे बेसिक फंडामेंटल्स पाहून पैसे गुंतवा
वॉरेन बफे म्हणतात की,” मजबूत फंडामेंटल्स असलेल्या कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूक कधीही वाया जात नाही. त्यामुळे मजबूत फंडामेंटल्स असलेल्या कंपन्या शोधुन त्यामध्ये दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करा. मजबूत मूलभूत तत्त्वे असलेल्या कंपन्या अशा कंपन्या आहेत ज्यांची बॅलन्स शीट, कमाई स्थिर आहे. तसेच त्यांचे व्यवस्थापन पात्र लोकांच्या हाती आहे. Investment Tips
पोर्टफोलिओमध्ये विविधता
वॉरेन बुफे नेहमीच सांगतात की,” जे गुंतवणूकदार आपली सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवतात ते नेहमीच तोट्यात असतात. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा कि, गुंतवणूकदारांनी आपले भांडवल कधीही एकाच ठिकाणी गुंतवू नये. गुंतवणूकदार वेगवेगळ्या ऍसेट्स क्लासमध्ये गुंतवणूक करून जोखीम कमी करू शकतात. एकाच मालमत्ता वर्गातील गुंतवणूक रिटर्नची गॅरेंटी देत नाही. यासोबतच धोकाही वाढतो. Investment Tips
प्रोडक्टिव्ह एसेट्समध्ये गुंतवणूक
वॉरेन बफे गुंतवणूकदारांना रिअल इस्टेट, वस्तू किंवा सेवांचे उत्पादन करणारे व्यवसाय आणि शेतजमीन यासारख्या प्रोडक्टिव्ह एसेट्समध्येमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. हे एसेट्स कॅश फ्लो निर्माण करतात. तसेच प्रोडक्टिव्ह एसेट्समध्ये गुंतवणूक केल्याने उत्पन्नाचा स्थिर आणि विश्वासार्ह स्त्रोतही निर्माण होतो जो बाजाराच्या कामगिरीपासून स्वतंत्र असतो.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/
हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर