हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market : जागतिक मार्केटमधील चांगल्या संकेतांमुळे आज (शुक्रवारी) भारतीय बाजारात चमक आली. आज आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी शेअर्स बाजारात चढ-उतार दिसून आले. मात्र तरीही बाजार हिरव्या चिन्हात बंद होण्यात यशस्वी झाला. आजच्या ट्रेडिंगमध्ये रियल्टी, मेटल आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून आली तर एनर्जी आणि इन्फ्रा शेअर्समध्ये तेजी दिसून आली तर एफएमसीजी, ऑटो आणि फार्मा शेअर्सवर दबाव होता. आज सेन्सेक्स 355.06 अंकांच्या म्हणजेच 0.62 टक्क्यांच्या वाढीने 57,989.90 वर तर निफ्टी 114.40 अंकांच्या म्हणजेच 0.67 टक्क्यांच्या वाढीने 17,100 च्या पातळीवर बंद झाला.
शुक्रवारच्या ट्रेडिंगमध्ये एचसीएल टेक्नॉलॉजीज, हिंदाल्को इंडस्ट्रीज, यूपीएल, अल्ट्राटेक सिमेंट आणि नेस्ले इंडिया हे निफ्टीमध्ये टॉप गेनर्स ठरले. तर दुसरीकडे, आयशर मोटर्स, एनटीपीसी, मारुती सुझुकी, आयटीसी आणि एशियन पेंट्स हे निफ्टीमध्ये टॉप लुझर्स ठरले. Share Market
हे लक्षात घ्या कि, गुरुवारी सेन्सेक्स 78.94 अंकांच्या किंवा 0.14 टक्क्यांच्या वाढीने 57,634.84 च्या पातळी तर निफ्टी 13.40 अंकांनी म्हणजेच 0.08 टक्क्यांच्या वाढीसह 16,985.60 वर बंद झाला होता. Share Market
IDBI बँकेच्या खाजगीकरणाची प्रक्रिया सुरू : DIPAM सचिव
शुक्रवारी केंद्र सरकारकडून सांगण्यात आले की,” IDBI बँकेच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया निर्धारित धोरणात्मक विक्री प्रक्रियेनुसार सुरू झाली आहे.” IDBI ची निर्गुंतवणूक पुढे ढकलली जाऊ शकते, या वृत्तही त्यांनी फेटाळून लावले. Share Market
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/
हे पण वाचा :
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर
Gold Price Today : देशांतर्गत बाजारात सोने-चांदी वधारली, तपासा आजचा नवीन दर
DigiLocker अॅपद्वारे अशाप्रकारे आपल्या स्मार्टफोनमध्ये ठेवा Driving Licence
Tax Saving Tips : ‘या’ 5 योजनांमध्ये गुंतवणूक करून वाचवा येईल टॅक्स, कसे ते जाणून घ्या
Bank Crisis : 2 आठवड्यात बुडाल्या 3 अमेरिकन बँका, अशावेळी भारतीय बँकांमध्ये आपले पैसे कितपत सुरक्षित आहेत जाणून घ्या