Share Market : ‘या’ शेअर्सने 1 वर्षात गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 250% रिटर्न !!!

Share Market
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market : टेक्सटाईल आणि ऑटोमोटिव्ह फॅब्रिक बनविणारी कंपनी असलेल्या Faze Three Ltd ने आपल्या गुंतवणूकदारांना भरपूर रिटर्न दिला आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना अवघ्या एका वर्षात 250 टक्के रिटर्न दिला आहे. या वर्षात, एकीकडे जिथे अनेक कंपन्यांचे शेअर्स घसरण आहेत, तिथे कंपनीने गुंतवणूकदारांना सुमारे 19 टक्के रिटर्न दिला आहे.

Faze Three Ltd हि एक स्मॉल कॅप कंपनी आहे. ज्याची मार्केट कॅप 834.02 कोटी रुपयांच्या घरात आहे. ही देशातील एक सुप्रसिद्ध होम टेक्सटाईल आणि ऑटोमोटिव्ह फॅब्रिक कंपनी आहे. या कंपनीचे शेअर्स सध्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मुव्हिंग एव्हरेजच्या (DMA) वर ट्रेड करत आहेत. Share Market

Home textile Manufacturers in India - Faze three Limited

Faze Three Ltd च्या शेअर्सची किंमत 24 मे 2021 रोजी 96.55 रुपयांवर होती, मात्र आज त्यामध्ये वाढ होऊन ती 336.70 रुपये झाली आहे. म्हणजेच अवघ्या एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने सुमारे 250 टक्के रिटर्न दिला आहे. आतापर्यंत कंपनीच्या स्टॉकने 18.54 टक्के रिटर्न दिला आहे तर गेल्या 6 महिन्यांबद्दल बोलायचे झाले तर या स्टॉकने 17 टक्क्यांहून जास्तीचा रिटर्न दिला आहे.

Faze 3 Ltd चे शेअर्स 17 जानेवारी 2022 रोजी 413 रुपयांवर पोहोचले होते. ही किंमत 52 आठवड्यांच्या सर्वोच पातळीवर होती. दुसरीकडे, जर आपण 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीबद्दल बोललो, तर तो 88.20 रुपये इतकी आहे, जो गेल्या वर्षी 21 मे रोजी स्टॉकने बनवला होता. Share Market

Home textile Manufacturers in India - Faze three Limited

Faze 3 Ltd चे एकूण उत्पन्न मार्च 2022 च्या तिमाहीत 44.53 टक्क्यांनी वाढून 157.06 कोटी रुपये झाले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीचा नफा 108.67 कोटी रुपये होता. त्याच वेळी, कंपनीचा करानंतरचा नफा (PAT) वार्षिक आधारावर 85.22 टक्क्यांनी वाढून 15.92 कोटी रुपये झाला आहे. वर्षभरापूर्वी तो 8.59 कोटी रुपये इतका होता. Share Market

Faze 3 Ltd ची आर्थिक स्थिती गेल्या 5 वर्षांत सातत्याने वाढते आहे. ज्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीवरही स्पष्टपणे दिसून येतो आहे. कापूस आणि पॉलिस्टर धाग्याच्या वाढत्या किंमतींमुळे कंपनीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ब्रोकरेज फर्मने Faze 3 चे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, त्याचे टार्गेट 405 रुपये ठेवण्यात आले आहे. Share Market

Oil And Natural Gas Corporation Ltd.: Share market update: OMCs rise; IGL,  ONGC, BPCL clock gains - The Economic Times

कंपनीच्या अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.fazethree.com/

हे पण वाचा :

Gold Price Today : सोन्यामध्ये घसरण तर चांदीमध्ये किंचित वाढ

Sim Card Rule : आता ‘या’ लोकांना सिमकार्ड मिळवण्यात येईल अडचण, जाणून घ्या सरकारचा नवा नियम

HDFC Bank च्या रिकरिंग डिपॉझिट्सवर आता मिळणार जास्त व्याज, नवीन दर पहा

Business Idea : केसांचा व्यवसाय सुरू करून दर महिन्याला मिळवा भरपूर पैसे

FD Rate : आता ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेने देखील FD च्या दरात केली वाढ !!!