हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खाजगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या IDFC First Bank च्या शेअर्समध्ये आज जोरदार वाढ झाल्याचे पहायला मिळाले. आज (4 ऑक्टोबर रोजी) दिवसभराच्या ट्रेडिंग दरम्यान हे शेअर्स सुमारे 10 टक्के वाढीसह 54.15 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. यादरम्यान या बँकेच्या शेअर्सने आपल्या गेल्या एक वर्षाच्या नवीन पातळीला स्पर्श केला. आदल्या दिवशीच बँकेकडून सप्टेंबरच्या तिमाहीतील आपल्या व्यवसायातील मजबूत वाढीबाबत शेअर बाजाराला रिपोर्ट पाठवला होता. ज्यानंतर आज या शेअर्सने शेअर्सची जोरदार उडी घेतली.
ग्राहकांच्या डिपॉझिट्समध्ये 35.9% वाढ
चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत IDFC First Bank च्या एकूण ग्राहकांचे डिपॉझिट्स 35.9 टक्क्यांनी वाढून 1,14,004 कोटी रुपये झाले आहेत. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ते 83,889 कोटी रुपये इतके होते. तसेच , बँकेच्या मागील तिमाहीच्या तुलनेत एकूण ग्राहकांच्या डिपॉझिट्समध्ये 10.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सप्टेंबरच्या तिमाहीत CASA रेशयो देखील वाढला
सप्टेंबर तिमाहीच्या अखेरीस या बँकेचा CASA रेशयो देखील 51.34 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. जो जूनच्या तिमाहीमध्ये 50.04 टक्के होता. तसेच, सप्टेंबरच्या तिमाहीत CASA डिपॉझिट्समध्ये वार्षिकरित्या 37 टक्क्यांनी वाढ होऊन ते 63,378 कोटी रुपयांवर पोहोचले. याच बरोबर तिमाही आधारावर यामध्ये 11.7 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
गेल्या वर्षभरात झाली फक्त 13 टक्के वाढ
BSE वर दुपारी 2.30 वाजेपर्यंत IDFC First Bank चे शेअर्स 8.81 टक्क्यांच्या उसळीसह 53.70 रुपयांवर ट्रेड करत होते. गेल्या एका वर्षात हे शेअर्स फक्त 13 टक्क्यांनी वाढले आहे. तसेच गेल्या साडेतीन महिन्यांत किंवा 23 जून 2022 पासून या बँकेच्या शेअर्समध्ये सुमारे 80 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
IDFC First Bank ही एक भारतीय बँकिंग कंपनी आहे, ज्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. अलीकडेच, स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या माहितीमध्ये, बँकेकडून सांगण्यात आले की, सप्टेंबरच्या तिमाहीत एकूण फंडेड एसेट्स 24.8 टक्क्यांनी वाढून 1,45,322 कोटी रुपये झाला आहे. यामध्ये बँकेचा रिटेल व्यवसायाचा वाटा 66.4 टक्के आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.idfcfirstbank.com/
हे पण वाचा :
Business : घरबसल्या ‘या’ 5 मार्गांनी दरमहा करता येईल हजारोंची कमाई !!!
Bank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले FD वरील व्याजदर, नवीन दर तपासा
Credit Card मधून पैसे काढणे कितपत योग्य आहे ??? ही सुविधा कधी वापरावी ते जाणून घ्या
FD Rates : कोणत्या बँकेकडून FD वर किती व्याज मिळत आहे ते पहा