शरद पवारांच्या भेटीनंतर शशिकांत शिंदेंनी केले ‘हे’ मोठे विधान; सातार्‍यात राजकिय भुकंप येणार?

राजकीय कारकिर्दीची वाटचाल सुरू करणार

सातारा : शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सातार्‍यात दाखल झाले आहेत. शिंदे यांचा पराभव शरद पवारांच्याही जिव्हारी लागल्याचं बोललं जातंय. आज पवार आणि शिंदे यांच्यात कमराबंद चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकित नक्की काय चर्चा झाली हे अद्याप कोणीच स्पष्ट सांगितलेलं नाहिये. पवारांच्या भेटीनंतर शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आपण यावर 25 तारखेला सविस्तर बोलणार असल्याचं सांगितलंय. तसेच लवकरच माझी राजकीय कारकिर्दीची वाटचाल स्पष्ट करणार असल्याचं शिंदे यांनी सांगितले.

जिल्हाबँकेत झालेल्या पराभवाबाबत शरद पवार यांनी विचारपूस केली. पवार साहेब माझी नेहमीच समजूत काढतात. निवडणुकीत हार जित होत असते. 25 तारखेला मी यावर सविस्तर बोलणार आहे. आता मी मोकळाच आहे राष्ट्रवादी वाढवण्यासाठी असं म्हणत शिंदे यांनी जिल्ह्यात सगळीकडे लक्ष घालणार असल्याचे सांगितले.