BMC निवडणुकीसाठी शिंदे- फडणवीसांची तिहेरी रणनीती? मनसेची भूमिका काय??

BMC
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धक्का दिला. त्यांनतर आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपने तिहेरी रणनीती आखत ठाकरेंना अजून एक धक्का देण्याची तयारी सुरू आहे. या सर्व घडामोडीत मनसेच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष्य असेल.

राज्यातील महापालिका निवडणूका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, मात्र तरीही सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. मुंबई महापालिका निवडणूकीकडे प्रामुख्याने सर्वच पक्षांचे लक्ष्य आहे. त्याच पार्श्वभूमीवर सध्या आधीच अडचणीत असलेल्या उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याची तयारी शिंदे गट आणि भाजपकडून सुरु आहे.

शिंदे – भाजपच्या रणनीती नुसार, मुंबईतील मराठी आणि प्रामुख्याने अमराठी मतांवर भाजप लक्ष केंद्रीत करेल. धनुष्यबाण चिन्ह मिळविण्यासाठी, आणि बाळासाहेबांची शिवसेना आपलीच असल्याचे पटवून देण्यासाठी शिंदे गट प्रयत्न करेल. तर स्वतंत्रपणे लढणाऱ्या मनसेला भाजप आणि शिंदे गटाकडून अदृश्य हातांची मदत केली जाईल, अशी शक्यता समोर येत आहे . मनसेसोबत युती करण्याचे जाणीवपूर्वक टाळून काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेनेचा समाचार घेण्याचे मनसेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले जाणार आहे.