Maharashtra Budget 2023 : शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा; दरवर्षी 6 हजार रुपये देणार

devendra fadnavis maharashtra budget Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) सादर केला. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रासाठी भरगोस तरतुदी करत घोषणांचा पाऊस पाडला. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे फडणवीस सरकारचे हे पहिलेच बजेट होत. त्यामुळे या बजेटकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य होत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर असलयाने यंदाच्या अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा अपेक्षित होत्या. आणि त्याप्रमाणेच फडणवीस यांनी घोषणांचा पाऊस पाडला. यावेळी त्यानी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारप्रमाणेच आता राज्य सरकार सुद्धा पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 जाहीर रुपये देणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचे वाचन करताना शेतकऱ्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या धर्तीवर राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजेनच्या माध्यमातून सरकारकडून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये देण्यात येतील. यामुळे आता शेतकऱ्यांना केंद्र सरकारचे 6 हजार आणि राज्य सरकारचे 6 हजार असे वर्षाकाठी एकूण 12 हजार रूपये मिळतील. महाराष्ट्रातील 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. यासाठी 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे.

याशिवाय, शेतकऱ्यांच्या विम्याचा हफ्ता सरकार भरणार असल्याची मोठी घोषणा सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी केली. यासाठी शेतकऱ्यांना फक्त एक रूपया भरावा लागणार असून शासनातर्फे यावर ३३१२ कोटी रूपये खर्च केले जाणार असल्याची माहिती फडणवीसांनी सभागृहात दिली.

शेतकरी मित्रानो, तुम्हाला सुद्धा सरकारच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सरकारी अधिकाऱ्यांपुढं चकरा मारायची गरज नाही. आत्ताच मोबाईल मध्ये Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. हॅलो कृषी मध्ये तुम्ही शेतकऱ्यांशी निगडित सर्व योजनांचा फायदा घेण्यासाठी अवघ्या 1 मिनिटात अर्ज करू शकता. ते सुद्धा अगदी मोफत मध्ये… त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हॅलो कृषी अँप मोबाईल मध्ये Install करा. हॅलो कृषी मोबाईल मध्ये ओपन करताच तुम्हाला कृषी योजना हा पर्याय दिसेल. त्यावर क्लीक करून तुम्ही या योजनांचा लाभ घेऊ शकता. याव्यतिरिक्त हॅलो कृषी मध्ये तुम्हाला सातबारा उतारा, जमीन मोजणी, हवामान अंदाज, रोजचा बाजारभाव यांसारख्या सुविधाही मिळतात, ते सुद्धा १ रुपयायी खर्च न करता. त्यासाठी आज हॅलो कृषी हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Hello Krushi मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी Click Here

देवेंद्र फडणवीसांच्या अन्य घोषणा सुद्धा पहा

शेतकऱ्यांचा पीक विमा राज्य सरकार भरणार

सेंद्रिय शेतीसाठी 1 लाख कोटींची तरतूद

राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार

धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 15 हजार रुपयांची मदत

शेळी, मेंढी पालन योजनेसाठी 10 हजार कोटींच्या कर्जाची तरतूद

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे इ-पंचनामे होणार

जलयुक्त शिवार भाग 2 योजना सुरू करणार

शेततळे योजनेचा विस्तार करणार

मच्छीमार लोकांसाठी 269 कोटींची तरतूद

मच्छीमारांसाठी 5 लाखांचा विमा काढणार

महिलांना ST प्रवासात सरसकट ५० टक्के सूट

आशा सेविकाच्या मानधनात 1500 वाढ

अंगणवाडी सेविकांचे मानधन 10 हजार करणार