अजितदादांना सहशिवसेनाप्रमूख करा, फडणवीसांची कोपरखळी… शिंदे म्हणतात ती संधी पण गेली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस असून राज्यपालांच्या आभारप्रदर्शनाच्या भाषणावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर खास करून निशाणा साधला. यावेळी अजित पवारांना सहशिवसेनाप्रमुख करा असं फडणवीसांनी शिंदेंना सांगितलं. यावर शिंदेनी दिलेल्या उत्तराने संपूर्ण सभागृह खळखळून हसला.

सभागृहात नेमकं काय घडलं –

एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना विविध मुद्द्यांवरून विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी अजित पवारांना लक्ष्य करताना ते म्हणाले, अजितदादा तर आता शिवसेनेचे एवढे प्रवक्ते झालेत कि त्यांना आता फक्त पदच द्यायचं बाकी आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावेळी खाली बसलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी हळूच त्यांना सहशिवसेनाप्रमूख करा असा टोला लगावला. मात्र आता अजितदादा सहशिवसेनाप्रमूख सुद्धा होऊ शकत नाहीत, त्यांची हि संधी सुद्धा गेली कारण शिवसेना आता आपल्याकडे आहे असं शिंदे म्हणताच सभागृहात एकच हशा फिकला.

शिंदेनी यांनतर सुद्धा अजित पवारांवरील आपला निशाणा सुरूच ठेवला. अजितदादा मी काहीही म्हंटल असेल परंतु माझ्यावर आत्मक्लेश करण्याची वेळ येईल असं मी काय बोललो नाही असं म्हणत शिंदेनी अजित पवारांना त्यांच्या त्या जुन्या विधानाची आठवणही करून दिली.