कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांमुळे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचे चित्र क्षणाक्षणाला बदलत आहे. आता हातकणंगले तालुक्यात जनसुराज्य पाठोपाठ शिवसेनेने कमाल करुन दाखविली आहे. येथील मिणचे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. याठिकाणी शिवसेनाप्रणित प्रवीण यादव युवा शक्ती आघाडीने 13 पैकी 10 जागांवर बाजी मारली. या विजयानंतर मिणचे गावात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला.
राधानगरी तालुक्यात शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्याविरोधात सर्वपक्षीय एकटवले होते. त्यामुळे येथील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता बारवे ग्रामपंचायतीमध्ये 9 पैकी सहा जागांवर शिवसेनाप्रणित पॅनलने विजय मिळवला. तर हातकणंगले तालुक्यातील बिरदेववाडी मध्ये 7 पैकी 6 जागा शिवसेनेला मिळाल्या आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील पाडळी ग्रामपंचायतीवर जनसुराज्य पक्षाने बाजी मारली असून गोराई ग्राम विकास आघाडीच्या 11 जागा निवडून आल्या आहेत. यामुळे कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.