हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेनेचा दसरा मेळावा उत्सहात पार पडला. या मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. त्यानंतर भाजपनेही ठाकरेंवर टीका केल्याने आता शिवसेना विरुद्ध भाजप असा कवाड रंगला आहे. त्यावरून आज शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र डागले आहे. “पहिल्यांदा भाजपने बेईमानी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर आज हि वेळ आली आहे. भाजपने बेईमानी केली नसती तर उद्धव साहेब बेईमान झाले नसते, असे पाटील यांनी म्हंटले आहे.
जळगाव येथे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या 12 रुग्णवाहिकांच्या लोकार्पण कार्यक्रम पार पडला. यानंतर मंत्री पाटील यांनी माध्यमांशी संवाद सोडला. यावेळी ते म्हणाले की, आज भाजप शिवसेनेसोबत नाही. लोकसभा निवडणुकीच्यावेळी भाजपने लोकसभेत शिवसेना विरोधात 4 उमेदवार उभे केले होते. त्यावेळी मी स्वत: भाजपकडे तक्रार केली होती.
पहिल्यांदा बेईमान कोण हे अगोदर भाजपने तपासावे आणि मग बोलावे. पहिले ते बेईमान झाले नसते तर आज ते जसे म्हणत आहेत तसे उद्धव साहेब बेईमान झाले नसते. पहिले भाजपने बेईमानी केली नसती तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती. राजकारणात महत्वाकांक्षा असणे चुकीचे नाही. मात्र, त्यासाठी मुखवटा परिधान करणे चुकीचे आहे. उद्धव ठाकरे यांनी आता तो मुखवटा उतरावा आणि मान्य करावे त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते.अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या टीकेला पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे.