हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिह कोशारी यांची राजभवन या ठिकाणी जाऊन भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. आमच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत राज्यपाल सकारात्म निर्णय घेतील, असे शिंदे यांनी म्हंटले.
विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर मंत्री एकनाथ शिंदे व बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद सदाला. यावेळी मंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही राज्यपालांकडे अध्यक्ष निवडीबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे. आमच्या विनंतीनंतर राज्यपालांनीही अध्यक्ष निवड प्राक्रियेबाबत सविस्तर माहिती घेऊ आणि निवड करू असे सकारात्मक उत्तर दिले आहे. एकंदरीत राज्यपालांनी आमच्या विनंतीवर सकारात्म भूमिका घेतली असल्याचे मंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उद्या 27 डिसेंबर रोजी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करायचा आहे. तर, 28 डिसेंबर रोजी नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी आज राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आज राजभवनावर आले होते. या तिघांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली.