हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात महाविकास आघाडी सरकार टिकण्याबाबत भाजपकडून शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आगामी निवडणुका स्वबळाबर लढण्याची तयारी असल्याचे संकेत दिले आहे. त्यांच्यानंतर आता शिवसेना नेते संजय राठोड यांनी आघाडी सरकारबाबत मोठे विधान केले आहे.
शिवसेना नेते तथा माजी वनमंत्री संजय राठोड यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटेल तोपर्यंत ते महाविकास आघाडी सरकार चालवतील व नंतर त्यांना वाटले तर त्याबाहेर पडण्याचा निर्णय घेतील. त्यामुळे सरकार टिकवायचं की नाही हे पूर्णपणे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हातात आहे.”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम चांगले असून देशभरात उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक झाले आहे. लोकांना शिवसेनेच्या सरकारचे काम आवडले आहे. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, वसंत दादा पाटील यांच्यापासून मोठी वैभवशाली राजकीय परंपरा असून अनेकांनी आपल्या कामाचा ठसा कार्यातून उमटविला आहे त्याचे भान ठेवून ती परंपरा प्रत्येकांनी जपली पाहिजे. सध्या महाराष्ट्रात संक्रमण परिस्थितीमधून जे राजकारण सुरू आहे, असेही राठोड म्हणाले.