मलिकांकडून फक्त इंटरव्हलपर्यंतची कथा, त्याच्यानंतरची मी सांगणार; संजय राऊतांच्या इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई-गोवा क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणात दररोज अनेक नवीन खुलासे उघडकीस येत आहेत. या दरम्यान प्रभाकर साईल यांचा व्हिडीओ आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे. “ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणातीळ अधिकारी समीर वानखेडे यांनी आतापर्यंत नवाब मलिक यांनी फक्त इंटरव्हलपर्यंतची कथा सांगितली आहे. आता त्याच्यानंतरची मी सांगणार आहे,” असा इशारा राऊत यांनी दिला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद डसादला. यावेळी ते म्हणाले की, ड्रग्ज प्रकरणात एक प्रकारचे हे षडयंत्र रचले गेले आहे. याची ईडीने सखोल याची चौकशी करणे गरजेची आहे. प्रभाकर साईल या प्रकरणातील महत्वाचा साक्षीदार आहे. त्याचा बालही बाका होणार नाही. त्याला त्रास देण्याचा प्रयत्न होईल. पण आम्ही त्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.

ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे मुंबईच असल्याचे सुरुवातीला वाटत होते. मात्र, चित्र वेगळेच असून याचे धागेदोरे आता दिल्लीपर्यंत असल्याचे वाटत आहे. आता अनेक गोष्टी बाहेर येतील. आता मलिक यांनी काही गोष्टी बाहेर आणल्या. आता इंटरव्हलनंतर बाकीची स्टोरी बाहेर येईल. आणि त्या मी बाहेर काढणार आहे, असा इशारा राऊत यांनी दिला.

You might also like