हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिल्लीतील संसदेच्या अधिवेशनात 127 व्या घटनादुरुस्ती विधेयकावर आजही चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी “127 व्या घटनादुरुस्तीचं विधेयक अर्धवट आहे. या विधेयकात दुरुस्तीनंतर देखील आरक्षणावर 50 टक्क्यांची जी मर्यादा आहे ती 30 वर्षांपूर्वीची आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. आपल्या हातात नेहमीच देशाच्या संरक्षणासाठी तलवार, बंदूक राहिली आहे. आमच्या हातात कधी तागडी-तराजू नाही आला, ना कधी चोपडी आली, असे म्हणत भाजपला टोला लगावला.
मराठा आरक्षणाच्या 127 व्या घटनादुरुस्ती विधेयकावर आज झालेल्या चर्चेवेळी खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मंडळी. काल मंजूर केलेले हे विधेयक विधेयक अर्धवट असून या विधेयकात दुरुस्तीनंतर देखील आरक्षणावर 50 टक्क्यांची जी मर्यादा आहे. त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने अगोदर ही मर्यादा हटवावी मग घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करावे, असे राऊत यांनी सांगितले.
आरक्षणाबाबत राऊत म्हणाले कि, सामाजिक न्यायाची अपेक्षा ठेऊन आम्ही आज संसदेत उभे आहोत. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे कि आम्ही मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका मांडणार, निर्णय घेणार. आमचे छत्रपती संभाजी राजे आंदोलनाचे नेते आहेत. देशभरातील ओबीसीमधील लाखो युवक आपल्याकडे बघत आहेत. त्यामुळे या विधेयकामध्ये बदल करणे आवश्यक आहे, असे राऊत म्हणाले.