सबका साथ, सबका विकास वाजपेयींनाच शोभा देतं; राऊतांचा मोदींना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा काल तिसरा दिवस पार पडला. दरम्यान अनेक मुद्यांवरून सत्ताधारी व विरोधकांच्यात चर्चा करण्यात आली. तर दुसरीकडे केंद्रात मोदी सरकारविरोधात विरोधकांकडून निशाणा सर्वज्ञात आला. आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. सबका साथ, सबका विकास हे वाजपेयींनाच शोभा देतं असे म्हणत राऊतांनी मोदींना टोला लगावला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, धर्मांधता, जातीयता या दोन शब्दांना दूर ठेऊन राजकारण करता येतं हे अटलबिहारी वाजपेयी यांनी दाखवून दिले. अटल बिहारी वाजपेयी हे उत्तम संसदपटू, माणुसकी काय असते, मानवता काय असते हे त्यांच्याकडून पाहिलं, देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचं काम पाहता आलं, देशाचे नेतृत्त्व पक्षाचं नेतृत्त्व नव्हे, देशाचं नेतृत्त्व कसं असाव हा परिपाठ त्यांच्याकडून घेता आला. शिवसेना आणि भाजपची युती झाली त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयींचं योगदान होतं. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना अनेक निर्णय घेण्यापूर्वी ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करत.

आजचा भाजप पाहता अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांची आठवण येते. अटलबिहारी वाजपेयी हे देशाचे असे नेते आहेत त्यांचं स्मरण प्रत्येक जण करतो. इंदिरा गांधी, राजीव गांधी असो अटलबिहारी वाजपेयींचा सन्मान करत होते. अटलबिहारी वाजपेयी कोणत्याही एका पक्षाचे नेते नव्हते, ते देशाचे नेते होते. सर्वांना सोबत घेऊन नेतृत्त्व केलं. सबका साथ, सबका विकास हे अटलजींना शोभा देत, असे म्हणत राऊत यांनी मोदींना टोला लगावला आहे.

Leave a Comment