नड्डांनी कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये, नाहीतर भाजप महाराष्ट्रातून नष्ट होईल; संजय राऊतांचा इशारा

0
39
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा हे मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. “येणाऱ्या काळात महाराष्ट्रात भाजपची सत्ता असणार आहे. महाविकास आघाडी सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार करणार, असे म्हणत नड्डा यांनी हल्लाबोल केला. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. “जे पी नड्डांनी कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये, नाहीतर भाजप महाराष्ट्रातून नष्ट होईल, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, केंद्रातील सरकारकडून तपास यंत्रणांनाचा वापर करून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर कारवाई केली जात आहे. काल मुंबईत महाविकास आघाडी सरकार उलथलून लावण्याची भाषा जे पी नड्डा यांनी केली आहे. नड्डा यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी महाराष्ट्रात आमच्या नादी लागू नका, हीतर भाजप महाराष्ट्रातून नष्ट होईल,

नड्डा यांच्या कानात महाराष्ट्रातील काही कपटी लोकांनी काही सांगितले असेल तर नड्डा यांनी त्या कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये. नाहीतर महाराष्ट्रात जो उरला सुरलेला भाजप आहे तो सुद्धा नष्ट होईल. कारण आम्ही भाजपला पाहिलेले आहे. पण आम्ही अगोदरचा भाजप व आताचा भाजप यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आजच्या भाजपला महाराष्ट्रातल्या कोणत्या भुताने झपाटले आहे. हे तपासावे लागेल, असे राऊत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here