खुर्चीवरून झालेल्या टोलेबाजीवर संजय राऊतांनी दिले ‘हे’ उत्तर; म्हणाले कि…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशन काळात निलंबित करण्यात आलेल्या राज्यसभेतील 12 खासदार धरणे आंदोलन करत आहेत. या खासदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट दिली. त्यावेळी पवार यांना बसण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत खुर्ची दिली. यावरून भाजप नेत्यांनी टोले लगावले. त्यांच्या टोलेबाजीला राऊतांनीही प्रत्युत्तर दिले आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांच्या जागी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी असते तरी त्यांना खुर्ची आणून दिली असती, असे राऊत यांनी म्हंटले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. “लालकृष्ण आडवणी असते तिथं तर त्यांना खुर्ची दिली असती. शरद पवार यांचं वय, पवार साहेबांना होणार त्रास, आम्ही जसं मांडी घालून बसतो तसं त्यांना बसता येत नाही. महाराष्ट्रातील पितृतुल्य वडिलधाऱ्या माणसाला मी खुर्ची आणून दिली ते जर कुणाला आवडलं नसेल तर ती महाराष्ट्राच्या राजकारणातील संस्कृती नसून विकृती आहे. ज्यांनी आडवाणी साहेबांना उभं राहू दिलं नाही, खुर्चीचा विषय सोडाच त्यांनी यासदंर्भात विचारु नाही.

यावेळी ते म्हणाले की, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यातील भेटी या वेगळ्या आहेत. राहुल गांधी आजही काँग्रेसचे सर्वेसर्वा आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसचं काम राहुल गांधी पाहतात. प्रियांका गांधी यांच्याशी काल भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सूचना घेऊन त्यांच्याशी बोललो. महाराष्ट्रात आम्ही एकत्र आहोत. महाराष्ट्राबाहेर सोबत काम करु शकतो. मात्र, मी मुंबईत गेल्यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना भेटून माहिती देईन.

महाराष्ट्रातील विरोधी पक्षाची प्रकृती बिघडली आहे – राऊत

माध्यमांशी साधलेल्या संवादावेळी राऊतांनी भाजपवरही निशाणा साधला. यावेळी लेआऊट म्हणाले की, महाराष्ट्रातील विरोधी पक्षाची प्रकृती बिघडली आहे. त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. एनसीबीनं त्यांची चाचणी करावी, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

Leave a Comment