बंडखोर आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीला अपघात, लाईव्ह व्हिडिओ आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट (mla sanjay shirsath) यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. संजय शिरसाट (mla sanjay shirsath) आज विमानतळावरुन शक्ती प्रदर्शन करत त्यांच्या मतदारसंघात जात होते. यावेळी त्यांच्याच ताफ्यातील केंद्रीय सुरक्षाचे जवान घेऊन जाणाऱ्या गाडीनेच त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात संजय शिरसाट (mla sanjay shirsath) बचावले असून ते सुखरूप आहेत. मात्र या अपघातानंतर आमदार संजय शिरसाट (mla sanjay shirsath) चांगलेच भडकले होते.

या अपघातातून आमदार संजय शिरसाट (mla sanjay shirsath) बचावले आहेत मात्र त्यांच्या लक्झरी गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 10 जूनला निवडणूक पार पडली. या निवडणुकीनंतर याच दिवशी रात्री शिवसेनेचे बंडखोर आमदार सुरतला रवाना झाले. त्यानंतर तिथून ते गुवाहाटीला गेले. तिथे काही दिवस मुक्काम केल्यानंतर गोवा आणि राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबईत आले. या आमदारांमध्ये संजय शिरसाट यांचा देखील समावेश होता.

संजय शिरसाट (mla sanjay shirsath) हे जवळपास 15 दिवसांनी आपल्या मतदारसंघात गेले. ते मुबंईहून औरंगाबाद विमानाने प्रवास करुन गेले. तिथून ते 100 गाड्यांच्या ताफ्यासह आपल्या मतदारसंघात गेले. यावेळी त्यांच्याकडून प्रचंड शक्तीप्रदर्शन करण्यात आले. त्यांनी औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांनादेखील वंदन केले. या शक्ती प्रदर्शनादरम्यान त्यांच्या गाडीला हा अपघात झाला. या अपघाताचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
तत्काळ तिकीट बुकिंगद्वारे अशा प्रकारे मिळवा कन्फर्म सीट !!!

ED ची छापेमारी : ‘Vivo’सह भारतातील 44 कंपनीवर धडक कारवाई

मुख्यमंत्री शिंदेंच्या घरातील भिंतीवर अजूनही ठाकरेच; फोटोंनी वेधलं लक्ष्य  

शेअर मार्केट मध्ये Pump and Dump द्वारे अशा प्रकारे केली जाते फसवणूक !!!

मुख्यमंत्री शिंदेंच्या घरातील भिंतीवर अजूनही ठाकरेंचं; फोटोंनी वेधलं लक्ष्य

Leave a Comment