56 वर्षे जनसेवेची, प्रखर हिंदुत्वाच्या तेजाने तळपत्या शिवसेनेची…’; वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचा टीझर जारी

0
46
Uddhav Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. अशात आज शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईतील हॉटेल वेस्ट इनमध्ये मुक्कामी ठेवण्यात आले असून याच ठिकाणी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. वाढत्या कोरोनामुळे मुख्यमंत्री ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. या दरम्यान आज शिवसेनेकडून टीझरही लॉन्च करण्यात आला आहे.

शिवसेनेकडून आजच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी नुकताच एक टीझर जारी करण्यात आला आहे. या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या तिघांच्या भाषणाची एक एक वाक्य दिली आहेत. यात हिंदुत्व आणि भगव्याचे राजकारण यावर भाष्य करण्यात आलेले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वेस्ट इन हॉटेलमध्ये शिवसेनेकडून वर्धापन दिनाचे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे.

यावेळेस होत असलेल्या निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा चारही पक्षांनी आपआपल्या आमदारांची मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच सगळे पक्ष खबरदारी घेत आहेत. दरम्यान आज साजरा होत असलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here