हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आल्यापासून शिवसेना आणि काँग्रेसची जवळीक वाढलेली आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत उद्या दिल्लीत राहूल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेणार असून त्यामुळे शिवसेना युपीए मध्ये थेट सहभागी होणार का या चर्चाना उधाण आले आहे. आगामी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार असल्याचे म्हटले जात आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई येथे काँग्रेस वर हल्लाबोल करत युपीए च्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. तेव्हाही शिवसेनेने सामना अग्रलेखातुन युपीए चे समर्थन करत काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी होऊ शकत नाही असे म्हंटल होत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना लवकरच अधिकृतपणे युपीए मध्ये सहभागी होऊ शकते अस म्हंटल जात आहे.
सध्या शिवसेना युपीए मध्येही नाही आणि एनडीए मध्येही नाही. पण संसदेच्या मागच्या अधिवेशनात राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यात भेट झाली होती. त्यानंतर संजय राऊत यांच्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वासोबतही अगदी सहजतेनं आणि वारंवारपणे भेटी होत आहेत त्यामुळे शिवसेना एनडीए मध्ये दाखल होऊ शकते.