शिवसेनेची विचारधारा चंचल झालीय : प्रवीण दरेकरांचे राऊतांना प्रतिउत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राजकारणाबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी एक विधान केले होते. राजकारनातील नेते हे चंचल असतात. तसेच चंचल राजकारणात कोणीही कोणासोबत जाऊ शकते, असे म्हणत राऊत यांनी भाजपवरही टीका केली होती. त्यांच्या या टीकेला भाजपनेते विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिउत्तर दिले आहे. “राऊत म्हणतात असे काहीही नसून उलट शिवसेनेची विचारधारांचे राजकीय नेत्याप्रमाणे चंचल झालेले दिसत आहे,” अशा शब्दात दरेकर यांनी राऊतांना प्रतिउत्तर दिल आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. तसेच राजकारण हे चंचल असल्याचे विधान केले होते. त्यांना दरेकरांनी मुंबईतुन प्रतिउत्तर दिले. आज दरेकर यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी दरेकरांनी राऊतांनि केलेल्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. तसेच मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवार यांच्या मनात असलेली इच्छाही बोलून दाखवली.

यावेळी दरेकर म्हणाले, ” संजय राऊत यांनी राजकारणाबाबत जे विधान केले आहे. त्यांनी जरा बारकाईने विचार करावा कि हि गोष्ट शिवसेनेच्या बाबतीत घडत आहे. तसेच राऊत यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेल्या स्पष्टीकरणाबाबत सांगायचं झालं तर त्यांच्या या पाच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या दाव्याला आमच्या शुभेच्या आहेत. मात्र, त्यांनी हे विसरू नये कि, अजित पवार यांचीही मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा लपून राहिलेली नाही.