शिवेंद्रसिंह आणि उदयन भोसले भव्य रॅलीद्वारे करणार शक्तीप्रदर्शन ; आज भरणार उमेदवारी अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी 

ऐन दुर्गोत्सवात विधानसभा निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी असल्यामुळे साताऱ्यात राजकीय उत्सवाचं वातावरणही पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी ४ दिवसांचा अवधी शिल्लक असताना सातारा-जावलीमधील भाजपचे उमेदवार शिवेंद्रसिंह भोसले हे आज (मंगळवारी) आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उदयन भोसले हेसुद्धा आजच आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दोन्ही नेत्यांचा पक्ष एकच असल्याने दोघेही भव्य शक्तिप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. आज सकाळपासूनच सुरुची आणि जलमंदिर पॅलेस या दोघांच्या राहत्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

शिवेंद्रसिंह यांनी स्वतः माध्यमांना प्रतिक्रिया देत भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर आम्ही ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकू असा विश्वास व्यक्त केला. आम्ही दोघ एकत्र आल्याने आणि एकाच पक्षात असल्याने मतदार संघाचा झपाट्याने विकास होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उद्यन भोसले यांच्या मातोश्री कल्पना भोसले यांनी मतदारांचं आजही उदयनराजेंवर प्रेम असून ही निवडणूक ते जिंकतीलच असा विश्वास व्यक्त केला. भाजपच्या शिवेंद्रसिंह विरुद्ध राष्ट्रवादीचे दीपक पवार अशी लढत सातारा – जावळी विधानसभेसाठी रंगणार असून, लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उदयन भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीनिवास पाटील अशी लढत रंगणार आहे.

रॅली पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –

[youtube https://www.youtube.com/watch?v=iarF80y7cFM&w=697&h=392]