हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना , राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात महाविकास आघाडी स्थापन झाली असली तरी स्थानिक पातळीवर मात्र तिन्ही पक्षात काही आलबेल नसल्याचे वेळोवेळी पाहायला मिळाले आहे. त्यातच आता शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर गंभीर आरोप केला आहे. पुण्यात राष्ट्रवादी कडून शिवसेना संपवण्याचे काम सुरु आहे असे आढळराव पाटील यांनी म्हंटल, तसेच शिवसैनिकाला सुखाने जगू द्या असेही ते म्हणाले
शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, लांडेवाडी येथे होणारी बैलगाडा शर्यत रद्द करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. बैलगाडा शर्यतीली परवानगी मिळाल्यानंतर पहिलीच बैलगाडा शर्यत आम्ही आयोजित केली म्हणून ती इतरांच्या डोळ्यात खूपली. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली. हे सगळं कारस्थान जिल्ह्यातील विरोधक आणि प्रशासनाने मिळून केले आहे. शिवसेनेला संपवण्याचा डाव सुरु आहे. शिवसैनिकांना जगू द्या, आमचं अस्तित्व राहू द्या असे ते म्हणाले.
आम्ही कोणाच्या नादी लागत नाही. पण गृहमंत्र्यांच्या एका जवळच्या कार्यकर्त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांला जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप त्यांनी केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर आम्ही सगळ्या गोष्टी सांगत आहोत असेही ते म्हणाले. आता आढळराव पाटील यांच्या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेस कडून काय प्रत्युत्तर येते हे पाहावे लागेल.