Tuesday, January 31, 2023

पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, महाविकास आघाडी केवळ तडजोड; शिवसेना नेत्याचं विधान

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार असताना शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी शरद पवारांवर केलेल्या एका विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत असे म्हणत काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म झाला असा आरोप त्यांनी केला आहे. ते रायगडमध्ये बोलत होते.

महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. दोन्ही काँग्रेस जर एक होऊ शकत नाहीत तर शिवसेना आणि काँग्रेस कदापि एक होऊ शकत नाहीत, असं अनंत गीते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच मुळात काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय, असा घणाघात गीते यांनी यावेळी केला.

- Advertisement -

राज्यात आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेचं नाही. सरकार आघाडी सांभाळेल. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची-माझी जबाबदारी गाव सांभाळायची आहे. आपलं गाव सांभाळात असताना आघाडीचा विचार करायचा नाही. आम्हाला फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे असे अनंत गीते यांनी म्हंटल.