या १२ जागांवरून शिवसेना भाजपमध्ये आहे तणाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असले तरी शिवसेना भाजप युतीचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. भाजपने शिवसेनेला ११५ जागांचा प्रस्ताव दिलेला आहे परंतू शिवसेना १२५ च्या मागणीवर ठाम असल्याची माहिती आहे. त्यामुळे १० ते १२ जागांवरून भाजप शिवसेनेत संघर्ष सुरू असल्याचे समजते. त्यामुळेच युतीची अधिकृत घोषणा होण्यासही विलंब लागत आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत गेल्या २५ वर्षांपासून अभेद्य असलेली शिवसेना-भाजपची युती तुटली. त्यानंतर राज्यात भाजपने आपली वाढलेली ताकद दाखवून देत १२२ जागांपर्यंत मजल मारली. यंदा मात्र दोन्ही पक्षांनी एकत्रिपणे विधानसभा निवडणुकांचा सामना करत आहेत. मात्र काही जागांवरून युतीचं घोड अडलं आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील माण, वाई, अक्कलकोट, पंढरपूर, फलटण, कागल तसंच विदर्भातील देवळी, रिसोड, गोंदिया आणि मुंबईतील वडाळा, पुण्यातील शिवाजीनगर आणि ठाण्यातील उल्हासनगर या जागांचा समावेश आहे.

राज्यात भाजपची ताकद आता वाढली आहे. लोकसभेनंतर शिवसेनेने युती तोडून दगाबाजी केल्याने भाजपने आपली ताकद वाढवली. त्यामुळे भाजपने जो अंतर्गत सर्व्हे केला त्यात स्वबळावर सत्ता मिळू शकते असं दिसून आल्याने भाजपचा आत्मविश्वास बळावला आहे. परंतू असे असले तरी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि केंद्रिय नेतृत्त्वाच्या प्रयत्नांनंतर झालेली ही युती विधानसभेत तुटू देणार नाहीत. तर लहान भावाची भूमिका घेऊन शिवसेनेला समाधानी कसं करता येईल याचा पुरेपूप प्रयत्न मुख्यमंत्री करत आहेत. त्यामुळेच ते आपल्या प्रत्येक भाषणात, पत्रकार परिषदेत बालताना युतीचं सराकार येईल असंच विधान करत असतात. आता युतीच्या अधिकृत घोषणेला कधीचा मुहूर्त लागतो हे पाहण्यासारखे असेल.