किरीट सोमय्यांची गाडी शिवसैनिकांनी फोडली; मुंबईत पुन्हा राडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांची गाडी शिवसैनिकांनी फोडली आहे. सोमय्या हे राणा दाम्पत्याना भेटायला खार पोलीस स्टेशनमध्ये भेटायला गेले असता संतप्त शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात सोमय्या किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या तोंडावर रक्त दिसत होते.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1083848232195448

नवनीत राणा आणि रवी राणा यांना भेटून किरीट सोमय्या पोलीस स्टेशनमधून बाहेर आले. यावेळी किरीट सोमय्या हे गाडीच्या मधल्या सीटवर बसले होते, तेव्हा त्यांच्या गाडीच्या काचेवर दगड फेकण्यात आला. सोमय्या यांच्या तोंडाला दुखापत झाली आहे. तर दुसरीकडे सोमय्या यांनीच आमच्या अंगावर गाडी चढवली होती, असा दावा शिवसैनिकांनी केलाय.

या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या जखमी अवस्थेत वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी दाखल झाले. जोपर्यंत या शिवसैनिकांना पोलीस ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत गाडीतून उतरणार नाही अशी भूमिका सोमय्यानी घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे शिवसेना विरुद्ध सोमय्या हा वाद पुन्हा एकदा पाहायला मिळाला.