बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदी यांना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा ; शिवसेनेचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यात मी सहभागी होतो आणि मला तुरुंगात देखील जावं लागलं अस वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश दौऱ्यावर असताना केलं. मोदींच्या या विधानाचा विरोधकांनी भरपूर समाचार घेतल्या नंतर आता शिवसेनेने हि देखील आपल्या सामनातील अग्रलेखातुन मोदींवर टीकेचे बाण सोडले आहेत.

देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात किंवा गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतलेल्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून ‘ताम्रपट’ आणि पेन्शन मिळते. या सुविधा बांगलादेश स्वातंत्र्य लढय़ातील मोदींसारख्या सैनिकांनाही मिळाव्यात. बांगलादेश स्वातंत्र्य संग्रामातील सैनिक म्हणून मोदी यांना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा. असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

उत्तर प्रदेशच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू असताना मोदी नेपाळच्या मंदिरात होते, तर प. बंगालातील पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या पूर्वसंध्येस मोदी प. बंगालच्या सीमेवरील बांगलादेशातील मंदिरात होते. हा योगायोग नक्कीच नाही. एका मुस्लिम देशातील मंदिरात देशाच्या पंतप्रधानाने अधिकृतपणे दर्शनासाठी जाणे हे मोदीप्रेमींना नक्कीच रोमांचकारी वाटू शकते. राजकीयदृष्टय़ा कमालीचे जागरुक असलेले मोदींसारखे दुसरे पंतप्रधान देशाच्या इतिहासात झाले नसतील. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच, अशी टिप्पणीही शिवसेनेनं केली आहे.

बांगलादेश स्वातंत्र्य लढय़ात आपलाही सहभाग होता, असे विधान मोदी यांनी बांगलादेशच्या भूमीवर जाऊन केले आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढय़ात सहभागी होऊन आपण तुरुंगवासही भोगल्याची माहिती मोदी यांनी दिली. २०-२२ वर्षांचे असताना आपण हा सत्याग्रह केल्याची माहिती मोदी यांनी दिली. त्यामुळे त्यांचे भक्त नक्कीच थरारुन गेले असतील. इंदिरा गांधींनी युद्ध करून पाकिस्तान तोडले आणि बांगलादेश निर्माण केला. यापेक्षा बांगलादेश निर्मितीसाठी मोदी यांनी सत्याग्रह केला हे शौर्य महत्त्वाचे असे भाजप कार्यकर्त्यांना वाटू शकते, असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

You might also like