हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर टीका केली. त्यानंतर शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी राणेंवर निशाणा साधला. “संजय राऊत आणि किरीट सोमय्यांच्या वादात तुम्ही कशाला पडता, तुम्ही राज्यसभेत बोलावे. तुम्ही राज्यसभेचे खासदार, तुम्ही लोकसभेत निवडून येऊ शकत नाहीत. जी कोकणाची संस्कृती आहे, त्याचा तरी विचार करा. ठाकरे कुटूंबाबद्दल बोलताना थोडी तरी लाज बाळगा ,” असे केसरकर यांनी म्हंटले आहे.
दीपक केसरकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, “नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल व ठाकरे कुटूंबाबद्दल बोलताना विचार करावा. ज्या कुटुंबामुळे नारायण राणे घडले, राजकीय जीवनात येऊ शकले, मंत्री, मुख्यमंत्री होऊ शकले, त्या कुटुंबाबद्दल बोलताना नारायण राणेंची जीभ थोडीतरी चाचरली पाहिजे. पण तेवढीही माणुसकी त्यांनी दाखवलेली नाही. तुम्ही अशा कुटुंबाबद्दल बोलताय, ज्या कुटुंबानं महाराष्ट्रासाठी आपल्या आयुष्याची होळी केली.
राणे यांच्याकडून राऊतांवर टीका केली जात आहे. मला राणेंना एवढंच सांगणे आहे की, संजय राऊत तुमच्याबद्दल बोलले होते का? मग तुम्ही का बोलता? लोकसभेत तुम्हाला उत्तर देता येत नाहीत. मग इथे येऊन का बोलता? सोमय्या कोणाबद्दल बोलले, राऊत कोणाबद्दल बोलले त्यात तुम्ही का उडी घेता?”असा सवाल केसरकर राणेंना विचारला.