हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार आहे याबाबत कोणताही संभ्रम मनात ठेऊ नका असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहे. आज मातोश्रीवर शिवसेना पदाधिकारी आणि विभागप्रमुख यांच्यासोबत उद्धव ठाकरेंची बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते.
यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार आहे, याबाबत कसलीही शंका नाही. त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी लागा आणि जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थिती लावा असे आदेश उद्धव ठाकरेंनी विभागप्रमुख आणि उपविभाग प्रमुखांना दिले. तसेच मुंबई महापालिकेत यासाठी रिमाइंडर अर्जही देण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितले
यावेळी त्यांनी वेदांत फॉक्सकॉइन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला. वेदांता प्रकल्प राज्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण हा प्रकल्प गुजरातमध्ये जात असताना सध्याचं राज्य सरकार काय करत होतं असा सवाल त्यांनी केला. शिवसेना फोडायचा काही जण प्रयत्न करीत आहेत. शिवसेना फोडण्या आधी इतिहास जाणून घ्यावा असंही उद्धव ठाकरेंनी म्हटल.