हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा अध्यक्ष निवडणूकीवरून महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी अध्यक्षपदाच्या निवडीवरून हरकत घेतल्यानंतर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. संविधानानुसार जर राज्यपाल वागत नसतील तर आघाडी सरकारने दोन हात करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
राज्यपाल हे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचे नोकर नाहीत. भारतीय राज्यघटनेच्या कलम १७८ नुसार राज्यपालांनी संवैधानिक शपथ घेतलेली असते. संवैधानिक कायद्याचं मी पालन करेन ही शपथ त्यांनी घेतलेली असते. त्यामुळे भारतीय संविधान जे सांगतं, त्यानुसार राज्यपाल वागत नसतील, तर राज्य सरकारने दोन दोन हात करण्याची हिंमत दाखवावी, असं माझं वैयक्तिक मत आहे”, असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.
5 जुलैला मी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केलं होतं. त्यावेळी भाजपच्या नितेश राणेंनी माझ्याबद्दल अवमानकारक विधान केलं होतं. नितेश राणे यांनी भास्कर जाधव यांना बिस्कीट देऊन 12 आमदारांचं निलंबन करायला लावलं असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुनचं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या वेळी हरिभाऊ बागडे यांच्यासदर्भात काय बोलले असते, असा सवाल मी केला होता. साधा प्रश्न होता, मला माफी मागायला लावता. मात्र, तुमचे सदस्य असं वागतात तेव्हा कुठे गेला होता राजा सुता तुझा धर्म, असा सवाल त्यांनी केला.