मुंबई । मुंबईतील जुहू येथील कंगनाच्या कार्यालयावर अनधिकृत बांधकामप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्यात आलं असून बाजू मांडण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी आपण बाजू मांडणार असून कोणी महाराष्ट्राची बदनामी करणार असेल तर षंढासारखं गप्प बसणार नाही असा इशाराही दिला आहे. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, “मी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढणारा एका सामान्य कार्यकर्ता, शिवसैनिक आहे. आम्हाला हे बाळकडू आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंत सर्वांनी दिलं आहे. जर कोणी महाराष्ट्राची बदनामी करत असेल, आमच्या नेत्यावर चिखलफेक करत असेल तर उसळून उठलं पाहिजे. आम्ही काही षंढासारखे बसून राहणार नाही”.
“उद्धव ठाकरे यांचीही तीच भूमिका आहे. मी महाराष्ट्राची भूमिका मांडली म्हणजे शिवसेनेची भूमिका मांडली. व्यक्तिगत स्वार्थासाठी महाराष्ट्राची बदनामी करु नका, केली तर आम्ही उसळून उठू,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.