हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यातील आरोप- प्रत्यारोप सुरूच आहेत. आता संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांचा फोटो सोशल मीडियावर टाकत त्यांच्यावर एकेरी शब्दांत जोरदार टीका केली आहे. किरीट सोमय्या हा महाराष्ट्रद्रोही तर होताच पण देशद्रोही असल्याचे उघड झाले आहे, असे संजय राऊत यांनी म्हंटल.
राऊत यांनी फेसबुक पोस्ट द्वारे म्हंटल की, आयएनएस विक्रांतच्या नावे ५६ कोटी गोळा करुन जनतेला, देशाला फसवणाऱ्या सोमय्या बाप बेट्यांना तुरुंगामध्ये जावेच लागेल. किरीट सोमय्या हा महाराष्ट्रद्रोही तर होताच पण देशद्रोही असल्याचे उघड झाले आहे,” असा टोला लगावलाय. त्याचप्रमाणे, “लोकांनी आता गप्प बसू नये. जवानांचे शोषण करणाऱ्या भाजपाला जाब विचारावाच लागेल,” असंही राऊत यांनी म्हटलंय.
https://www.facebook.com/113449342685590/posts/943776136319569/
नेमकं काय आहे प्रकरण-
भारतीय नौदलाची विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी किरीट सोमय्यांनी लोकवर्गणीतून जमा केलेला निधी राजभवनापर्यंत पोहोचला नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
2013 मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्य सरकारनं विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी असमर्थतता दर्शवली. निवृत्त झालेली विक्रांत भंगारात जाऊ नये, त्याऐवजी तिचं रुपांतर म्युझियममध्ये करण्यात यावं अशी भूमिका त्यावेळी भाजपनं घेतली. त्यासाठी किरीट सोमय्यांनी निधी गोळा केला. आपण हा निधी राज्यपाल भवनाकडे पाठवणार असल्याचं त्यावेळी सोमय्यांनी सांगितलं होतं.
दरम्यान, सोमय्यांकडून नेमकी किती रक्कम जमा करण्यात आली, अशी विचारणा माहिती अधिकार अर्जातून धीरेंद्र उपाध्याय यांनी राजभवनाकडे केली असता अशी कोणतीही रक्कम किंवा धनादेश सोमय्यांकडून प्राप्त झाला नसल्याची माहिती राजभवनाकडून देण्यात आली. त्यामुळे सोमय्यांनी विक्रांतसाठी गोळा केलेले पैसे गेले कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.