Sunday, April 2, 2023

राज्यपालांनी घटनेचा खून करु नये ; संजय राऊतांची सडकून टीका

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यापालांनी घटनेचा खून करु नये अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न जाणून-बुजून प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. विधनापरिषदेच्या 12 जागा 10 महिने झाले तरी रिकाम्या कशा ठेवू शकता असे विचारत घटनात्मक पदावर बसून घटनेचे मारेकरी होत आहात का? असा बोचरा सवाली राऊत यांनी राज्यपालांना केला.

संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, “विधान परिषदेच्या 12 जागा तुम्ही कशा रिकाम्या ठेवू शकता? आज 10 महिने होत आले, तुम्ही घटनेचे मारेकरी म्हणून काम करताय का घटनात्मक पदावर बसून. तुम्हाला अभ्यास करायला किती वेळ लागतो? की, जोपर्यंत हे सरकार पाडलं जात नाही आणि माझ्या मनासारखं सरकार येत नाही. तोपर्यंत मी राज्यपाल नियुक्त शिफारसी ज्या केलेल्या आहेत, त्यावर सही करणार नाही, असा आदेश राज्यपालांना आले आहेत का? हे राज्यपालांनी स्पष्ट केलं पाहिजे

- Advertisement -

यावेळी त्यांनी भाजप देखील निशाणा साधला. भारतीय जनता पक्षाला जर याविषयी काही वाटत असेल, आणि जर ते महाराष्ट्राचं काही देणंघेणं लागत असतील, तसेच त्यांच्या घटनेशी काही संबंध असेल, तर त्यांनी राज्यपालांना जाऊ सांगायला पाहिजे.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’