SBI ने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना एटीएम कार्ड आणि पिन कसे सुरक्षित राखावे याबाबत केल्या सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) बँकिंग घोटाळा टाळण्यासाठी आपल्या लाखो ग्राहकांना स्ट्स्ट सतर्कतेचा इशारा देत राहते. एसबीआयने ग्राहकांना असे सुचवले आहे की, बँकिंगमधील कोणताही घोटाळा टाळण्यासाठी ग्राहकांनी एटीएमवर संपूर्ण गुप्ततेने व्यवहार करावा. एटीएममधून रोख रक्कम काढणे सोपे आणि सोयीस्कर आहे, परंतु त्याच्याशी संबंधित फसवणूकीच्या बातम्याही वेळोवेळी येतच असतात. अशा परिस्थितीत डेबिट किंवा एटीएम कार्ड सुरक्षित पद्धतीने वापरणे आणि एटीएममधून व्यवहार करताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांना सुरक्षित ठेवण्यासाठी काही मार्ग सांगितले आहेत.

https://twitter.com/TheOfficialSBI/status/1346738485458190336?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1346738485458190336%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Fsbi-alter-your-atm-card-and-pin-are-important-some-tips-to-keep-your-money-safe-samp-3406771.html

SBI ने ट्विट केले की, “तुमचे एटीएम कार्ड आणि पिन अत्यंत महत्वाचे आहेत. आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी काही टिप्स खाली दिलेल्या आहेत.”

  1. एटीएम-कम-डेबिट कार्डाची फसवणूक टाळण्यासाठी ATM व्यवहार पूर्णपणे गुप्तपणे केले पाहिजेत.

  2. एटीएम किंवा POS मशीनवर एटीएम कार्ड वापरताना आपल्या हाताने कीपॅड झाकून घ्या.

  3. आपला पिन किंवा कार्डच्या डिटेल्स कधीही शेअर करू नका.

  4. आपल्या कार्डवर कधीही पिन लिहू नका. असे टेक्स्ट मेसेज, ईमेल आणि कॉल्समध्ये ज्यांमध्ये कार्ड डिटेल्स किंवा पिन विचारले जात आहेत त्यांना प्रत्युत्तर देऊ नका.

  5. तुमचा सद्य मोबाईल क्रमांक बँकेत रजिस्टर्ड केला गेला आहे याची खात्री करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व व्यवहारांसाठी अलर्ट मिळू शकेल.

  6. एटीएम / डेबिट कार्ड हरवले किंवा चोरी झाले असल्यास ताबडतोब बँकेला कळवा, त्यासंबधी रिपोर्ट करा.

https://t.co/9KqfbJx5MY?amp=1

  1. ट्रान्सझॅक्शन अलर्ट एसएमएस आणि बँक स्टेटमेंट नियमितपणे तपासा.

  2. डेबिट रकमेच्या एसएमएससाठी तुमचा फोन त्वरित तपासा.

  3. हे वापरण्यासाठी कोणाचीही मदत घेऊ नका किंवा तुमचे कार्ड कोणालाही देऊ नका.

  4. ट्रान्सझॅक्शन करताना मोबाइल फोनवर बोलणे टाळा.

https://t.co/gKmkOyG5X4?amp=1

नुकतेच बँकेने डेबिट कार्ड युझर्ससाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. आपले व्यवहार सुरक्षित करण्यासाठी एसबीआयने देशातील सर्व एटीएमवर 18 सप्टेंबर 2020 पासून देशातील 10,000 आणि त्याहून अधिक रक्कम काढण्यासाठी वन-टाइम पासवर्ड (OTP) सुविधा सुरू केली आहे.

https://t.co/f7wcBX2AAI?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment