गोव्यात शिवसेना- काँग्रेस एकत्र लढणार ? संजय राऊतांच्या ट्विटने चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीची शक्यता निर्माण झाली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या एका ट्विट ने चर्चाना उधाण आले आहे. गोव्यात महाराष्ट्रा प्रमाणे महविकास आघाडीचा प्रयोग करता येईल का ? यावर चर्चा झाली. असे स्पष्ट विधान संजय राऊत यांनी केलं

आज गोव्यात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबरोबर आगामी विधानसभा निवडणुकी बाबत चर्चा झाली. दिनेश गुंडू राव दिगंबर कामत आणि गिरीश चोडणकर तसेच माझे सहकारी जीवन कामत जितेश कामत उपस्थित होते. गोव्यात महाराष्ट्रा प्रमाणे महविकास आघाडीचा प्रयोग करता येईल का ? यावर चर्चा झाली. असे ट्विट संजय राऊत यांनी केले.

शिवसेनेची गोव्यात फार अशी मोठी ताकद नाही, पण गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यातील जवळीक वाढली आहे त्यामुळेच आगामी निवडणुकीत गोव्यात शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढणार का, याकडे सगळ्यांची नजर लागली आहे. तसेच जर महाविकास आघाडीचा प्रयोग झाला तर जागावाटपात प्रत्येकाला किती जागा मिळणार हेही पाहावे लागेल