Tuesday, June 6, 2023

एकदा हात पोळल्यानंतर कोणावर इतका विश्वास ठेवायचा नसतो; संजय राऊतांनी टोचले कान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरु असताना रश्मी शुक्ला यांनी लहान पक्षाच्या आमदारांना भाजपसोबत जाण्यासाठी धमकावले होते.त्यांच्या सोबत जाऊ नये. तुमच्या फाईल तयार आहेत. यड्रावकरांपासून अनेक आमदारांना रश्मी शुक्ला धमक्या देत होत्या. हे सर्वांना माहिती होते. भाजपा सरकारसोबत जा, असे इशारे पोलीस खात्याकडून दिले जात होते. तरीही शुक्लांना महाविकास आघाडीच्या सरकारने तरीही 6 महिने पदावर ठेवले होते याचे मला आश्चर्य वाटते, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.

एकदा हात पोळल्यानंतर कोणावर इतका विश्वास ठेवायचा नसतो. शरद पवारही याच मताचे आहेत. रश्मी शुक्ला यांच्यावर वेळीच कारवाई केली असती तर विरोधी पक्षनेत्यांना दिल्लीत कागद फलकावयची संधी मिळाली नसती, असे संजय राऊत यांनी म्हटले.

अधिकाऱ्यांवर कधीही विसंबू राहू नका, अस्तनीतील निखाऱ्यांना वेळीच दूर करा, ही बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण होती. राज्यात युतीची सत्ता आल्यावर बाळासाहेबांनी तत्कालीन मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची तातडीने बदली करण्याचे आदेश दिले होते, याची आठवण संजय राऊत यांनी करुन दिली

देवेंद्र फडणवीस यांनी एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाच्या ठिकाणी मला फटकेबाजी करायला मजा येते, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी लूज बॉलवर फटकेबाजी जरूर करावी. पण मोठ्या विकेट या लूज बॉलवरच जातात, हे त्यांनी लक्षात ठेवावे.असे म्हणत राऊतांनी टोला लगावला.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group