व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

महाग पडेल म्हणजे काय ? ED पकडून आणखी एक खोटं कांड करणार का? राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वर टीका केल्यानंतर संजय राऊतांना माझी चेष्टा महागात पडेल असा इशारा पाटील यांनी दिला. त्यावर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पलटवार करत महाग पडेल म्हणजे नेमकं काय? ईडी पकडून आणखी एक खोटं कांड करणार का? असा सवाल केला आहे.

नव्या धमकी बद्दल धन्यवाद.महाग पडेल म्हणजे? Ed पकडून आणखी एक खोटे कांड करणार. बदनामी मोहीम राबवणार. मुलाबाळांना त्रास देणार. बरोबर? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्या बाबत जी भाषा तुम्ही वापरता.चेष्टा करता ते सहन करायचे ? शिवसेनेशी केलेली चेष्टा किती महाग पडलीय हा अनुभव आपण घेताय असे ट्विट संजय राऊत यांनी केलं.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?
संजय राऊत यांच्याकडून माझी सारखी चेष्टा केली जाते पण मी अंगावर येणार आहे. संजय राउताना माझी चेष्टा महागात पडेल. उद्या सामनामधून माझी खिल्ली उडवली जाईल पण काळ तुम्हाला दाखवून देतील तुम्ही कुणाची खिल्ली उडवता, असं म्हणत पाटील यांनी संजय राऊतांना इशारा दिला.