हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणावरून राज्यात राजकीय वातावरण गरम झालं आहे. याच पार्श्वभूमीवर माझ्या हातामध्ये सूत्रं दिल्यास ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देईन अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, 2014 साली देखील देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही असेच वक्तव्य केले होते. मला चांगले आठवत आहे की आपल्या पहिल्या कॅबिनेट मधेच धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेऊ अस फडणवीस तेव्हा बोलले होते. पण त्यांनी ते दिल नाही त्यामुळे फडणवीस यांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करु नये, असे संजय राऊत यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी अनिल देशमुख आणि प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडी कारवाईवर देखील भाष्य केले. चुकीच्या पद्धतीने कारवाया होत आहेत” असे राऊत म्हणाले. “सत्ता गेल्यावर ज्यांना नैराश्य आले आहे, त्यांनी नैराश्यातून आणि वैफल्यातून अशा प्रकारच्या चौकशीचा ससेमिरा मागे लावला आहे. सत्ताधारी पक्षातल्या प्रमुख नेत्यांवर ठरवून कारवाई केली जात आहे असे राऊत म्हणाले.